⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | पातोंड्याच्या विवाहितेची गगनभरारी, वायुदलात झाली निवड

पातोंड्याच्या विवाहितेची गगनभरारी, वायुदलात झाली निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । स्वप्न ही सर्वांसाठी सारखीच असतात फरक एवढाच की, ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रमांची तयारी असावी लागते. अशीच एक प्रेरणा देणारी बातमी चाळीगाव तालुक्यातील पातोंडा येथील कामिनी तुषार सूर्यवंशी या विवाहितेने कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनही मनाची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते, हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. कामिनी सूर्यवंशी या विवाहितेची नुकतीच वायुदलात निवड झाली आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या नर्सिंग स्टाफ परीक्षेत १०० पैकी ९४ गुण मिळवून त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

गोंडगाव येथून जवळच असलेल्या घुसडी (ता. मडगाव) येथील माहेर असलेल्या कामिनी सूर्यवंशी यांचे, मातृछत्र लहानपणीच हरपले. तर त्यामुळे आजी-आजोबा, मामा, वडील, काका, आत्या यांनी त्यांचे संगोपन केले. कामिनी यांचे प्राथमिक शिक्षण घुसडी येथे, तर माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या गोंडगावात झाले. त्यानंतर त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण चाळीसगावला राष्ट्रीय महाविद्यालयातून पूर्ण केले. औरंगाबाद येथून त्यांनी नर्सिंग कोर्स केला. या दरम्यान, त्यांचा पातोंडा येथील तुषार सूर्यवंशी यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या कामिनी यांना त्यांच्या सासरच्यांनी देखील मोलाची साथ दिली. एअर फोर्सच्या नर्सिंग स्टाफमधील एकमेव जागेसाठी भारतातून शेकडो अर्ज आलेले होते. ७५ जणींची तिसऱ्या टप्प्यातील यादीत निवड झाली. तर अंतिम निवडीत कामिनी सूर्यवंशी यांनी बाजी मारली. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.

कर्नाटकात प्रशिक्षण

यश मिळवण्यासाठी कामिनी सूर्यवंशी यांना त्यांच पती तुषार सर्यवंशी व कुटुंबीय तसेच वडील वसंत शिंदे, भाऊ तुषार शिंदे यांचा पाठिंबा होता. कामिनी यांनी हे यश संपादन केल्याने पुढील आठवड्यात त्या कर्नाटकात प्रशिक्षणासाठी जात आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या कामिनी यांना त्यांच्या सासरच्यांनी देखील मोलाची साथ दिली. एअर फोर्सच्या नर्सिंग स्टाफमधील एकमेव जागेसाठी भारतातून शेकडो अर्ज आलेले होते. ७५ जणींची तिसऱ्या टप्प्यातील यादीत निवड झाली. तर अंतिम निवडीत कामिनी सूर्यवंशी यांनी बाजी मारली. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.

इतरांना मिळेल प्रेरणा

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनही मनाची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते, हे कामिना सूर्यवंशी यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यामुळे घरकाम सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी त्यांचे उदाहरण प्रेरणादायी आहे.

हे देखील वाचा :


author avatar
टीम जळगाव लाईव्ह