जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरचे धूड अचानक उचकल्याने धूडखाली दाबले गेल्याने दोन सख्या भावांच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना भुसावळ तालुक्यातील सुसरी ते पिंपळगाव खुर्द दरम्यान घडली. जालमसिंग धरमसिंग पावरा (वय १९) आणि त्याचा सख्खा मोठा भाऊ लालमसिंग धरमसिंग पावरा (वय २३) असे मृत दोघांचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
चालक जालमसिंग धरमसिंग पावरा (वय १९) हा ट्रॅक्टरने (एमएच १९-एपी.३३९७, ट्रॉली क्रमांक एम.एच.एल.४४३५) राखेची वाहतूक करत होता. ट्रॉलीत राख भरून तो नेहमीप्रमाणे सोमवारी सुसरी गावमार्गे पिंपळगावकडे जात होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास आसरा माता मंदिराजवळ ट्रॅक्टरचे पुढील बाजूचे धूड अचानक उचकले. यामुळे भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन अपघात झाला.
त्यात धूड खाली सापडून चालक जालमसिंग धरमसिंग पावरा (वय १९) आणि त्याचा सख्खा मोठा भाऊ लालमसिंग धरमसिंग पावरा (वय २३) हे दोघे दाबले जाऊन ठार झाले. तर ट्रॉली पलटी झाल्याने त्यात बसलेला महेंद्र अशोक सुरवाडे (रा.गोळेगाव) हा बाजूला फेकला जाऊन जखमी झाला. सुरवाडे याच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत मृत ट्रॅक्टर चालक जालमसिंग पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक आशिष अडसूळ करत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित