मकर संक्रातीला १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

फेब्रुवारी 18, 2022 10:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । येथील कांचननगरमध्ये राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाने काहीतरी कारणावरून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी उघडकीस आली. मयताच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच हंबरडा फोडला होता.

suicide child jpg webp

यश रमेश राजपूत (वय १३, रा.कांचन नगर) असे मयत मुलाचे नाव आहे. शनिपेठेतील असलेल्या कांचन नगरातील राहत्या घरी सकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. यशचे वडील रमेश सुकलाल राजपूत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदानचे काम करतात.

घटनास्थळी शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक बळीराम हिरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन माहिती घेतली. १२ वर्षीय मुलाने मकर संक्रांतीच्या दिवशी गळफास घेतल्यामुळे शहरात शोककळा पसरली आहे. गोड सणाला दुःखद प्रसंग घडल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

हे देखील वाचा :

    चेतन वाणी

    पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now