जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कानळदारोडवर घडली. विकास लीलाधर चौधरी (वय ५२ रा आव्हाणे ता. जळगाव) हे जखमी झाले असून याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, आव्हाणे येथील विकास चौधरी व त्यांची पत्नी वंदनाबाई हे दोघे जण ३ जानेवारी रोजी त्यांच्या एम.एच.१९ ऐ.वाय ५८१६ या क्रमांकांच्या दुचाकीने चोपड्याकडे जात होते. यादरम्यान कानळदा गावाजवळ एम.एच.४८ ए.टी. १३३९ या क्रमांकाच्या कारने विकास चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विकास चौधरी यांच्या उजव्या पायाला, तसेच कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळाहून पसार झाला होता. याप्रकरणी जखमी विकास चौधरी यांच्या पत्नी वंदनाबाई चौधरी यांच्या तक्रारीवरुन कारचालक रविंद्र रामा कुंभार याच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
हे देखील वाचा :
- पारोळ्यातील कुख्यात गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई
- जळगावात मोठा गेम! 1 फेब्रुवारीला ठाकरे गटाला पडणार मोठं खिंडार
- Gold Rate : सोन्याचा भाव पुन्हा वाढला ; जळगावमध्ये आता 10 ग्रॅमसाठी इतके पैसे मोजावे लागणार?
- कंटेनर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; दोन जण गंभीर
- Chalisgaon : क्रूझर व दुचाकीच्या भीषण अपघात; चाळीसगावची महिला ठार, सहा जण जखमी