⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चार दरोडेखोरांना अटक; दोन पसार

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चार दरोडेखोरांना अटक; दोन पसार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना मुक्ताईनगर पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे‌.मात्र अंधाराचा फायदा घेत दोन जण पसार झाले. हि घटना ६ रोजी संध्याकाळी चिंचखेडा लगत घडली. दरम्यान, चौघांकडून ४ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
मुक्ताईनगर ते कुऱ्हा रोडवर चिंचखेडा गावाच्या फाट्याजवळ दरोडा टाकणारे चार जण कारमध्ये आले असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पोलीसांनी मिळाली. त्यानुसार सोमवार ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकून दरोडा टाकणारे कन्वरलाल रामप्रसाद पवार (वय-३५), देव डॅनी पवर (वय-२२), राहूल कपीलाल भोसले (वय-२३), करण कपुर डॅनी पवार (वय-२४) सर्व रा. मधापुरी ता. मुक्ताईनगर या चौघांना अटक केली.

त्यांच्याकडून चार मोबाईल, ५ हजारांची रोकड आणि मारूती कार असा एकुण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रदीप इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.