भांडण बघायला गेलेल्या तरुणावर केला वार : गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । दारूच्या दुकानासमोर सुरू असलेले भांडण बघायला गेलेल्या एका रिक्षाचालकांवर वस्तारासारख्या शस्त्राने कानावर व गालावर वार झाल्याची घटना गणेश कॉलनीतील दारूच्या दुकानासमोर घडली. भाऊसाहेब कुलथे (वय ३५ खंडेराव नगर) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर घटना अशी की, बाळासाहेब कुलथे हा तरुण रिक्षाचालक आहे. ८ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता गणेश कॉलनीतील अपणा वाईन शॉप समोर काहीजण आपसात भांडण करीत होते. त्यावेळी बाळासाहेब हा मित्र दीपक बाविस्कर (आशाबाबा नगर) याला घेऊन तेथे गेला असता. त्यावेळी एका जणाने बाळासाहेब याच्या गालावर व कानावर वस्ताऱ्याने वार केला. यात डावा कान व गालावर दुखापत झाली आहे. बाळासाहेब याच्यावर हल्ला झाल्याचे पाहून मित्र दीपक हा तेथून पळून गेला.
दरम्यान, बाळासाहेब याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील जबाब प्राप्त झाल्यानंतर सोमवारी अज्ञात दोन जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
हे देखील वाचा :
- गिरणा पाटचारीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
- जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबेना! अज्ञात वाहनाच्या धडकेत काका पुतण्याचा मृत्यू
- शेकोडीत पडून गंभीर भाजलेल्या चिमुकला उपचारादरम्यान मृत्यू
- पारोळ्यातील कुख्यात गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई
- Chalisgaon : क्रूझर व दुचाकीच्या भीषण अपघात; चाळीसगावची महिला ठार, सहा जण जखमी