---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

शेकोडीत पडून गंभीर भाजलेल्या चिमुकला उपचारादरम्यान मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द गावात एक दुर्देवी घटना घडली आहे, ज्यामुळे शेकोडीत पडून गंभीर भाजला गेलेल्या आठ महिन्याचे चिमुकला उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवांशु सुनिल सोनवणे (वय ८ रा. नांद्रा खुर्द ता.जि.जळगाव) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव असून या घटनेमुळे कुटुंबियाने एकच अक्रोश केल्याचे दिसून आले.

child dead yawal jpg webp

जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द गावात सुनिल सोनवणे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ जानेवारी रोजी सायंकाळी शेकोटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी देवांश हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला होता. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

---Advertisement---

त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---