मोठी बातमी : कुमार चिंथा यांची गडचिरोली अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची नुकतेच बदली झाली होती. डॉ.प्रवीण मुंढे यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नव्हती. सोमवारी राज्यातील पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असता त्यात डॉ.प्रवीण मुंढे यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता यांची गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची नुकतेच बदली करण्यात आली होती तर त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली होती. जळगाव जिल्ह्याचा पदभार एम.राजकुमार यांनी पदभार स्वीकारला असला तरी डॉ.प्रवीण मुंढे यांची इतर कोणत्याही ठिकाणी पदस्थापना करण्यात आली नव्हती.

पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले डॉ.प्रवीण मुंढे यांनी काही दिवसापूर्वीच जळगाव शहर सोडले होते. राज्य शासनाने सोमवारी पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे जम्बो गॅझेट प्रसिद्ध केले त्यात मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी डॉ.प्रवीण मुंढे यांची पदस्थापना करण्यात आली आहे. धुळे येथील अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची नाशिक पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

जळगाव शहर उपविभागीय अधिकारी कुमार चिंता यांची देखील पदोन्नती होणार होती. सोमवारी शासनाने ५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता यांची वर्णी गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक म्हणून लागली आहे.