बातम्या
टाकरखेडा येथे शेती साहित्याची चोरी
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । टाकरखेडा ( ता.यावल ) येथील शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या भुरट्या चोरट्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यावल पोलिसांना निवेदन दिले.
रविवारी येथील पोलिस ठाण्यात टाकरखेडा येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्यात गेल्या काही दिवसांपासून शेत शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटना होत आहेत. नुकतेच अनेकांच्या शेतातून स्प्रिंकलर, केबल आणी इतर शेती साहित्य चोरी गेले. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी विजय चौधरी, रामचंद्र चौधरी, समाधान चौधरी, विलास चौधरी यांनी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्याकडे केली.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन