⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रायसोनी महाविद्यालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकीची प्राध्यापक-पालक सभा संपन्न

रायसोनी महाविद्यालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकीची प्राध्यापक-पालक सभा संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सभेसाठी इस्टीट्यूटचे ऍकेडमिक डीन प्रा.डॉ.प्रणव चरखा, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सोनल पाटील व प्राध्यापकवृंद तसेच द्वितीय, तृतीय, व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

सभेची सुरुवात प्रा.हिरालाल सोळूंखे यांच्या प्रेझेन्टेशनने झाली. त्यांनी संगणक, माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स या विभागातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सभेचे समन्वयक व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सोनल पाटील यांनी सदर सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी (क्रीडा,ग्रंथालय,खानावळी,कमी मूल्यात जेवण) तसेच रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच शिक्षकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश तसेच विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. शेवटी पालकांनी पाल्यांच्या मानसिक तसेच शारीरिक बदलाकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी आयोजित चर्चासत्रात सर्व पालकांनी उत्स्फुर्त संवाद साधला. पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. पालकांनी विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले.प्रा.स्वाती पाटील यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

सभेच्या यशस्वीसाठी प्रा.शीतल जाधव, प्रा.हर्षद पाटील व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचा-यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह