जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । जुने मित्र-मैत्रीण भेटणे म्हणजे आयुष्यातला एक प्रकारचा सोहळाच मानला जातो. त्याचप्रकारे फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमधील १९८६ च्या बॅचचे ७० विद्यार्थी रविवारी ३६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. या स्नेहमेळाव्यात सर्वांनी जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना सेवानिवृत्त शिक्षक पी.जे.राजपूत यांनी, जीवन जगताना आपण आपले कर्म करत राहावे. विपरीत परिस्थिती, संकट आले तरीही आत्मविश्वास कायम ठेवावा. यामुळे सर्व संकटांवर मात करता येतो, असे सांगितले. पी.जे.राजपूत, बी.यू.मेश्राम, नितीन राणे, हेमलता नागपुरे, दत्तू कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. नागपुरे यांनी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाका माजी संचालक नितीन राणे, तर व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष हेम राज चौधरी, एल.के.धांडे, एच.सी.किरंगे, पी.जे.राजपूत, ए.पी.भारंबे, पी.एस.चौधरी, सी.डी.चौधरी, एम.एच.वराडे, एन.एन.नारखेडे, सी.के.चौधरी, डी.डी.इंगळे, बी.यू.मेश्राम, बी.जी.चौधरी, डी.के.भंगाळे, इच्छा राम नारखेडे, शकुंतला सराफ, विजया चौधरी, विमल शिंपी, प्रभारी मुख्याध्यापक के.टी.तळेले उपस्थित होते.
हे देखील वाचा:
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात






