जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे तापमान चढ-उतार दिसून आला. पुढील चार दिवसांत हवामान काेरडे राहणार असून दिवसा कमाल तापमान तब्बल ३२ अंशांपर्यंत जाणार असल्याने उन्हाचा चटका जाणवेल. तर किमान तापमानदेखील १७ अंशांपर्यंत वाढणार असल्याने थंडीची तीव्रता कमी असणार आहे.

गेल्या आठवड्यात उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे गारठा वाढला हाेता. अवकाळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ वातावरणात धुक्यासाेबत थंडीही वाढली हाेती. वाऱ्याचा वेग वाढल्याने ढगाळ वातावरणात दिवसाचा गारठाही वाढला हाेता; परंतु १ जानेवारीपासून ढगाळ वातावरण काहीसे निवळल्याने सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढली हाेती.

तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने दुपारी गारठा जाणवला नाही. येत्या चार दिवसांमध्ये कमाल अाणि किमान तापमानात वाढ हाेणार आहे. कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत तर किमान तापमान १७ अंशांपर्यंत वाढणार असल्याने थंडीची तीव्रता कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- आसोदा उड्डाणपूल प्रकरणाची नितीन गडकरींकडून गंभीर दखल; दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
- खवय्यांसाठी नवी पर्वणी! ‘हॉटेल तन्वी गार्डन’ जळगावकरांच्या सेवेत..
- जळगावातील युवकांसाठी खुशखबर ; नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
- पंढरपूर वारी ठरली एसटीसाठी लाभदायी ! आषाढी वारीत जळगाव विभागावच्या तिजोरीत ‘इतक्या’ कोटींची कमाई!











