जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे घडलीय. विठाबाई नामदेव जाधव असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
मुळ रायगड जिल्ह्यात कुशेळावाडी येथील आणि सध्या खर्दे तालुका असलेल्या विठाबाई जाधव ह्या पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विठाबाई जाधव या घरी असताना पती नामदेव जाधव याने विट भट्टीसाठी कोळसा व गवत आण असे सांगत होता. त्यावेळी पत्नी ही दारू पिली असल्यामुळे त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत होती. याचा राग आल्याने रागाच्याभरात नामदेव जाधव याने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात व चेहर्यावर मारून तिला बेशुद्ध केले.
पत्नीला साप चावल्याचा बनाव करून रुग्णालयात केले दाखल
दरम्यान जखमी अवस्थेत नामदेव जाधव यांनी पत्नीला साप चावल्याचा बनाव करून रुग्णालयात दाखल केले होते. चेहऱ्यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी नामदेव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयित आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.
हे देखील वाचा :
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
- अॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर
- भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार
- जळगावत अपघाताची मालिका सुरूच; फुपनगरी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघे मित्र ठार