जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । रायसोनी इस्टीट्यूट येथील प्रा.सोनल पाटील यांना नुकतीच सरदार वल्लभभाई नॅशनल इस्टीट्यूट टेक्नोलॉजी सुरत येथून कॉम्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्या जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट येथे संगणकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे.
त्यांनी “फोटो व व्हिडिओमधील फेरफार शोधून काढणे” या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.कृपा जरीवाला यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याडॉ.पी.के.पाटील व सुरेखा पाटील यांच्या सुकन्या आहेत.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..