जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । राेजगारासाठी पुण्यात गेलेल्या यावल येथील २६ तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू झाला. हेमंत प्रदीप तळेले असे मृताचे नाव आहे. हा तरुण दीड महिन्यापूर्वीच पुण्याला नोकरीकरिता गेला होता. कामावर जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करत असताना ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने त्यास चिरडले. या अपघातात इतर दोन असे एकूण तीन जण ठार झाले आहेत.
हेमंत तळेले हा पुणे-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ कामावर जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करत उभा होता. दरम्यान सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पुलावरून मार्गस्थ होणारा ट्रक पुलावर इंधन संपल्याने त्याचा चालक इंधन टाकून ट्रक सुरू करण्यासाठी ब्रेक लावून इंधन पाइपमधील एअर काढत होता. त्याचवेळी अचानक ब्रेक निकामी झाल्याने ट्रक चालकाविना मागील बाजूने उतारावर धावू लागला.
यात बसची प्रतीक्षा करणाऱ्या हेमंत तळेलेसह इतर दोघे तरुण या ट्रकखाली चिरडले जावून जागीच ठार झाले. याबाबत सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मृत हेमंत तळेले याचा मृतदेह येथे आण ला. बुधवारी सकाळी ७ वाजता त्याच्यावर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. हेमंत कुटुंबातील एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, बहीण व मेहुणे असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा