जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । उद्यमी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका रेवती शेंदुर्णीकर यांची लखनौ येथे झालेल्या सहकार भारतीच्या अधिवेशनात राष्ट्रीय महिला प्रमुखपदी निवड करण्यात आली.

या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या वेळी देशभरातील बचत गट, महिलांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांना भय्याजी जोशी, सतीश मराठे यांनी मार्गदर्शन केले. अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रीय महिला प्रमुखपदी रेवती शेंदुर्णीकर यांची निवड करण्यात आली.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ







