पोस्टाच्या ‘या’ योजनेत 50 रुपये जमा करून 35 लाख मिळवा, जाणून घ्या योजनेबद्दल?

डिसेंबर 25, 2021 3:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. येथे तुम्हाला शून्य जोखमीसह चांगले परतावा देखील मिळतो. जर तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला नफाही मिळेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी चांगले आहे.

sip invest plan 2

35 लाख रुपये मिळतील
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. आम्‍ही तुम्‍हाला एक अशी गुंतवणूक सांगतो ज्यात जोखीम नगण्य असते आणि परतावाही चांगला असतो. आम्ही पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुरक्षा योजने’बद्दल बोलत आहोत. इंडिया पोस्टने ऑफर केलेली ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला दरमहा १५०० रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास तुम्हाला आगामी काळात 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.

काय आहेत गुंतवणुकीचे नियम?
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते.
या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.
तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांची सूट मिळते.
या योजनेवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.
ही योजना घेतल्यानंतर तुम्ही 3 वर्षांनी ते सरेंडर देखील करू शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

काय आहेत फायदा?
समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories