जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात मागील तीन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. मात्र, आज या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या दरात वाढ नोंदविली गेलीय. तर दुसरीकडे चांदीचा भाव देखील वधारला आहे. आज सोने (Gold) १४० रुपयाने महागले आहे. तर चांदी (Silver) प्रति किलो ४०० रुपयांनी महागली आहे. त्यापूर्वी काल सोन्याच्या दरात १८० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीच्या भावात ३९० रुपयाची होती.

सध्या अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव वाढला असून याच पार्श्वभूमीवर येथे लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आगामी काळात सोने दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)
आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,३३० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,६५० इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.-
मागील गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या भावात घसरण झाली. यात ६०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये चढ उतार होताना दिसत आहे. सध्या लग्नसराई सुरु असून यात सोने-चांदी मागणी वाढली आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने देखील गुंतवणूकदार धास्तावले आहे. असं असताना मागील तीन दिवसापासून सोने दरात घसरण दिसून आली. मात्र आज सोन्याच्या भावात वाढ दिसून आली.
२० डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,७३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५९० रुपये असा होता. २१ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,८६० रुपये इतका नोंदविला गेला. २२ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२५० रुपये इतका नोंदविला गेला.
तुमच्याकडचे सोने खरे आही की बनावट तपासता येते…
देशात चार प्रकारचे सोने मिळतेआपल्या देशात चार प्रकारचे सोने मिळते. पहिला प्रकार शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट, याचे दागिने बनविता येत नाहीत. अन्य तीन प्रकारातून दागिने बनविले जातात. त्यापैकी एका प्रकारातून लोकांना ‘बनविले’ जाते. तुम्ही सोन्याच्या बाजारातील दरानेच सोने खरेदी करता. शुद्ध सोन्यासाठी जेवढे पैसे मोजता तेवढेच अशुद्ध सोन्यासाठी देखील मोजता. जर तुमची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धता ओळखता आली पाहिजे.
हे देखील वाचा :
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- सोने-चांदी खरेदीदारांसाठी गुड न्यूज! जळगावात आज दोन्ही धातूंचे दर घसरले
- अरे देवा..! सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा जळगावचे आजचे दर
- गणेशोत्सवाच्या तोंडावर सोने-चांदी महागली; जळगावच्या सराफ बाजारात मोठी तेजी!
- सोने पुन्हा महागले, चांदीही कडाडली; जळगावात १ तोळ्याचा दर पोहोचला ‘इतक्या’ रुपयांवर?









