जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव येथील एका २७ वर्षीय युवकाने प्रेमभंग झाल्याच्या कारणातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उधडकिस आली. समाधान महाजन (वय २७) असे मृत युवकाचे नाव असून आत्महत्येपूर्वी भिंतीवर प्रेमभंग झाल्याने आपण आत्महत्या (Suicide) करीत असल्याचे लिहिलेले आढळून आले. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत असे की, किनगाव येथील राजू महाजन हे आपल्या पत्नी दोन मुले व लहान मुलाची सूनसह जिप शाळेजवळ राहतात. दरम्यान बुधवारी ते त्यांची पत्नी, लहान मुलगा व लहान मुलाची पत्नी त्यांचेसह सर्व शेतात कामाला गेले होते.
तर त्यांचा अविवाहित मोठा मुलगा समाधान महाजन (वय २७) हा घरी एकटा होता. त्याच वेळेस गळफास घेऊन समाधान याने आत्महत्या केली. हा प्रकार महाजन कुटुंबीय सायंकाळी साडेपाचला शेतातून घरी परतले तेव्हा उघडकीस आला. सदर प्रकार पाहून महाजन कुटुंबीय प्रचंड हादरले.
आत्महत्येपुर्वी लिहिले भिंतीवर
याबाबतची माहिती पोलिसांना (Police) दिली असता घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार पथकासह दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला. समाधान याने आत्महत्येपूर्वी भिंतीवर प्रेमभंग झाल्याने आपण आत्महत्या (Suicide) करीत असल्याचे लिहिलेले आढळून आले. समाधान महाजन याने बारावीनंतर आयटीआयचे शिक्षण करून तो वडिलांसोबत शेतीकाम करायचा. या प्रकरणी यावल पोलिसात मयत समाधान महाजन यांचा भाऊ योगेश महाजन यांनी दिलेल्या खबरवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार अजित शेख हवालदार नरेंद्र घुले करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात आई- वडील, लहान भाऊ, वाहिनी असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल
- धडधड वाढली! पोस्टल मतमोजणी सुरु