जळगाव जिल्हा

देवकर रुग्णालयात वृद्धावर गॅंगरीनची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात तब्बल ८७ वर्षीय वृद्धावर गॅंगरीनची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी येथील डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले.

पाचोरा तालुक्यातील वरसाळे येथील रहिवासी प्रल्हाद तान्हू पाटील यांना महिनाभरापासून अंडकोशाजवळ त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्या मुलांनी त्यांना पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. यात त्यांना अंडकोशाजवळ गॅंगरीन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. व पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. अशातच प्रल्हाद पाटील यांच्या मुलांना देवकर रूग्णालयबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी पाटील यांना देवकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
येथील डॉक्टरांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून गॅंगरीनचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. जनरल सर्जन डॉ.समीर चौधरी, आयसीयू तज्ञ डॉ.प्रियंका पाटील, डॉ.स्नेहल गिरी, भूलतज्ञ डॉ.आशी अन्वर या डॉक्टरांच्या टीमने सर्व धोके लक्षात घेता शस्त्रक्रियेला सुरुवात केली. अखेर पाटील यांच्या अंडकोशाला जवळील गॅंगरीन दूर करण्यात डॉक्टरांना यश आले. नंतर त्यांना रिकवरीरूम मध्ये ठेवून उपचार करण्यात आले. यशस्वी उपचारानंतर त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

डॉक्टरांचे मनापासून आभार

प्रल्हाद पाटील यांचे पुत्र गुलाबसिंग पाटील यांनी सांगितले, की गेल्या महिन्याभरापासून वडिलांना अंडकोशाजवळ होणारा त्रास पाहिला जात नव्हता. त्यांना गॅंगरीन झाल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्व कुटुंब चिंतेत होते. अशावेळी आम्हाला देवकर हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही तातडीने हॉस्पिटल गाठले. येथील डॉक्टरांनी अगदी कसब पणाला लावून आमच्या वडीलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि होणाऱ्या त्रासापासून त्यांची मुक्तता केली, याबद्दल आम्ही रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button