एरंडोल तालुक्यातील साेनबर्डी येथील रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या मुरुमाचे जुन्या धारागीर परिसरातून उत्खनन केले जात आहे. येथे उत्खनन करताना कामगारांना पुरातन महादेवाची पिंड व मंदिराचा एक पुरातन खांब आढळून आला. हे अवशेष पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली हाेती.
जुने धारागिर परिसरातील अंजनी धरणाला लागून असलेल्या भगतवाडी शेजारी असणाऱ्या वितरण कंपनीच्या सब स्टेशन शेजारी वसंत सहकारी साखर कारखाना साईटमागून नांदखुर्द गावापर्यंत डांबरी रोडाचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या मुरूमाचे खोदकाम या परिसरात सुरू असताना अचानक जमिनीखाली एक पुरातन शिवलिंग व पुरातन मंदिराच्या खांब्याचे अवशेष आढळून आल्याने बघ्यानी एकच गर्दी केली होती.
याची बातमी संबंधित ठेकेदार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस संदिप वाघ यांना फोनवरून कळविली त्यानंतर संदिप वाघ,यांच्यासोबत उज्वल पाटील, सचिन पाटील, ठेकेदार हेमंत पाटील,जेसीबी चालक कैलास कुंभार यांच्यासह इतर नागरिकांनी सदरची मूर्ती वसंत सहकारी साखर कारखाना येथील श्रीदत्त मंदिरात आणून तिची विधिवत पूजा करून सदरची मूर्ती दत्त मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.