जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मार्च 28, 2021 4:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । जळगाव शहरातील योगेश्वर नगरातील २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. पराग गोकुळ खडके (वय-२८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याबाबात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

पराग खडके हा आपल्या आई भाऊ व पत्नीसह राहतात असून तो गेल्या आठ ते दहा वर्षांपासून एमआयडीसीतील छबी ईलेक्ट्रिक कंपनीत कामाला आहे. २७ मार्च रोजी रात्री मित्रांसोबत गप्पा मारून घरी गेला. त्यानंतर रात्री जेवन करून झोपले. मध्यरात्री पराग खडके याने छताला दोरीच्या सहाय्याने पत्नी झोपलेली असताना गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार आज २८ मार्च रोजी पहाटे ५ वाजता परागची आई शोभाबाई ह्या पाणी भरण्यासाठी उठले. त्यावेळी त्यांनी खिडकीतून मुलगा परागने गाळफास घेतल्याचे दिसून आले.

मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण  कळू शकले नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. परागचा  चार वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now