लोणी फाटा येथे अपघात; १ ठार २ जखमी

डिसेंबर 3, 2021 11:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । लोणे ( ता. धरणगाव  ) येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ट्रक चालकाला नागरीकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.

accident jpg webp

सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील लोणी फाटा गावाजवळून भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर (एमएच १९ झेड ३२४३) ने समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच १९ डीपी ८६०२) ने ट्रीपल सीट जात असतांना जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. तर सोबत असलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीन धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर मयताचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान मयताचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघात घडल्यानंतर नागरीकांनी पळून जात असलेल्या आयशर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला आणि धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now