सुरभिचा वर्धमान दिन साजरा

नोव्हेंबर 30, 2021 5:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । शहारातील “आश्रय” मतिमंद मुलांच्या आश्रमात नुकताच “सुरभि”चा २१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी 20 मुलांना नित्यउपयोगी वस्तू, खाऊ, डाळ, तांदूळ, चहा, साखर, ड्रायफ्रूट, तेल, डिटर्जंट पावडर व केक, नॅपकिन वाटप करण्यात आले.

surbhi jpg webp

कार्यक्रमाच्या सुरवातीला मंडळाच्या अध्यक्षा, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांकडून केक कापुन साजरा करण्यात आला. दरवर्षी वर्धापनदिन वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेत वर्धापनदिन साजरा करीत असतात.

यावेळी मुलांना नित्यउपयोगी वस्तू, खाऊ, डाळ, तांदूळ, चहा, साखर, ड्रायफ्रूट, तेल, डिटर्जंट पावडर व केक, नॅपकिन वाटण्यात आले. दरम्यान, अध्यक्षा स्वाती कुळकर्णी यांनी व्यवस्थापिका रेखा पाटील यांच्या नॅपकीन श्रीफळ देऊन सन्मान केला, रेखा पाटील ह्यांनी आश्रयची सर्व मुलांची व तेथील सर्व व्यवस्था कशी ठेवली जाते. याची माहिती तसेच अध्यक्षा स्वाती कुळकर्णी यांनी सुरभि मंडळाच्या कार्या विषयी सांगितले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी उपाध्यक्षा रेवती शेंदुर्णीकर, सचिव मंजुषा राव, सविता नाईक, वैशाली कुळकर्णी, संजीवनी नांदेडकर, मेघा नाईक, अश्विनी जोशी, माधुरीताई फडके उपस्थित होत्या.

यांनी केले आर्थिक सहकार्य 

भारती लाड, छाया करकरे, प्राजक्ता पारंगावकर, प्रज्ञा जोशी, सरोजताई वाडकर, निलीमा नाईक, वृषाली दलाल, चैताली मोरदे, वैशाली ढेपे, तनुजा पाठक, पूनम जोशी, शिल्पा नाईक, अंजली पाटील, अविता जोशी, विनया भावे, रागिणी तांबोळी, प्रियंका जोशी, आशाताई कानेटकर, आर्या शेंदुर्णीकर यांनी आर्थिक सहकार्य केले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now