नायगाव येथे रात्री उशिरापर्यंत ‘कोविशिल्ड’ लसीकरण

नोव्हेंबर 29, 2021 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । नायगाव ( ता. यावल ) येथे कोरोना लाट आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांच्या घरी जात रात्री उशिरापर्यंत ‘कोविशिल्ड’ लसीकरण केले.

naygaon jpg webp
सविस्तर असे की, यावल तालुक्यातील नायगाव येथील इंसानियत 786 व्हाट्सएप ग्रुपच्या जनजागृतीतून कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ‘ओमीक्रोन्ट व्हेरिएंट’ या नवीन ‘भयावह’ विषाणूला आळा घालण्यासाठी डॉ.मनीषा महाजन यांनी सतर्कता म्हणून उशिरापर्यंतनागरिकांचे कोविशिल्ड’ लसिकरण करत जनजागृती केली.

 

यांनी केले सहकार्य 

डॉ.मनीषा महाजन वैद्यकीय अधिकारी किनगाव, कुर्बान छब्बीर तडवी (वाहन चालक) वारके ताई, नसिमा मुस्तफा तडवी (आशा), महेमुदा सिराज तडवी (आशा) आदींसह इंसानियत ग्रुपचे सदस्य बबलू तडवी, अरफान तडवी नजीर तडवी, मुस्तफा तडवी, सरफराज तडवी, बि.राज तडवी, शाबीर तडवी, न्याजिद्दीन तडवी, अकबर तडवी, सिकंदर तडवी, अस्लम तडवी, हसन तडवी सोबत इतरांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now