भाजपचे आ.मंगेश चव्हाण यांना अटक

मार्च 26, 2021 10:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील विजबील तोडणी संदर्भात आ. चव्हाण यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी जळगाव येथील अधिक्षक कार्यालयात अधिक्षक अभियंता यांना खुर्चीला बांधले. याप्रकरणी आ. चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

mangesh chavan

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून आज शुक्रवार २६ मार्च रोजी वीज वितरणच्या जळगाव येथील एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात धडक दिली आहे. याप्रसंगी त्यांनी रूद्रावतार धारण करत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. याप्रसंगी त्यांच्या सोबत अनेक शेतकर्‍यांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र अधिकार्‍यांनी आपण कार्यवाही करत असल्याचे उत्तर दिले. तालुक्यातून गेल्या आठ दिवसात तब्बल सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दलही त्यांनी जाब विचारला होता.

समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेख यांना खूर्चीला बांधलेल्या अवस्थेतच कॅबिनमधून मुख्य कार्यालयाच्या आवारात आणले होते, वेळीची एमआयडीसी पोलीसांनी दखल घेतल अधिक्षक अभियंता यांची सुटका केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांना अटक केली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सूरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now