चाळीसगाव

चाळीसगावात नवीन खुल्या कारागृहाला शासनाची मंजुरी ; आमदार मंगेश चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे नवीन खुले कारागृह स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत गृह विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे चाळीसगाव येथे नवीन कारागृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रस्तावित खुल्या कारागृहात बंदी बॅरेक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने तसेच आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात कारागृह व्यवस्थेवरील ताण कमी करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील कारागृहांमध्ये बंदींची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे नवीन कारागृह उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने नवीन खुले कारागृह स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे चाळीसगावच्या विकासात आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाची भर पडणार असून, कारागृहाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. शासन निर्णयानुसार पुढील टप्प्यात कारागृहाच्या बांधकामासह आवश्यक सुविधांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील कारागृहातील वाढती गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होणार असून, चाळीसगाव येथे नवीन कारागृहाची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button