रावेर येथे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जेलभरो आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । भारतातील साडे पाच हजार तालुक्यात ओ.बी.सी.ची जणगणना करावी, शेतकर्यांच्या विरोधात जाहीर केलेले काळे कायदे कायदेशीर मार्गान रद्द करावेत, ई.व्ही.एम. ऐवजी बॅलेट पेपर्सचा वापर करावा, एस.टी.महामंडळाचे विलिनीकरण करावे, आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय ओ.बी.सी. मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा व निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे गुरूवारी रावेर शहरात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
जेलभरो आंदोलन निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभ बाविस्कर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. शेतकरी नेते सोपान बाबुराव पाटील यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी भारत मुक्ति मोर्चाचे खान्देश विभागीय अध्यक्ष नितीन गाढे यांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घोषणांच्या गजरात केला. या प्रसंगी पोलिस प्रशासनाने असर्व आंदोलकाना अटक करून पोलिस व्हॅनने पोलीस स्टेशनला आणले व नंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेश तायडे, जिल्हा नियोजन समिती उपप्रमुख सदाशीव निकम, अशोक तायडे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे, तालुका उपाध्यक्ष सुधीर सेंगमिरे, शरद पितांबर तायडे, अकिल खाँ, एकनाथ गाढे, युवक तालुकाध्यक्ष विजय धनगर, शरद बगाडे, धनराज वाघोदे, प्रवीण वाघ, विशाल गाढे, जलील खान, शे.नजीर, शे.रशीद तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.