⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | Breaking! जळगावात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणी ठार, एक चिमुकला जखमी

Breaking! जळगावात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणी ठार, एक चिमुकला जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरामधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच शहरातील महामार्गावरील मानराज पार्क ते गुजराल पेट्रोल पंपादरम्यान भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणी जागीच ठार झाल्या तर एक वर्षीय चिमुकला जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी १.५० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी मोठा जमाव जमला.

काय आहे घटना?
या घटनेबाबत असे की, दोन तरुणीसह एक चिमुकला आज बुधवारी दुपारी १.५० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच.१८.एएस.५३७९ ने खोटेनगर स्टॉपकडून उड्डाण पुलाने मानराज पार्ककडे जात होते. उड्डाणपूल उतरताच भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला असून चिमुकला जखमी झाल्याचे समजते.

यादरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला असून पोलीस पोहचले आहेत. दरम्यान, घटनेनंतर ट्रक चालक पसार झाल्याचं कळतंय.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.