---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत गुलाबराव पाटलांनी साधला निशाणा ; म्हणाले…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२३ । शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुसता स्वत:च्या दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता, अशी जहरी शब्दात टीका गुलाबराव यांनी टीका केलीय.

gulabrao patil sanjay raut jpg webp webp

लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोगतात म्हणजे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर तसेच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

---Advertisement---

अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत. मात्र, आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्यास मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. संजय राऊतसुद्धा आमच्यावर टीका करत आहेत. महापुरुषांबद्दल काहीतरी बोलता येते. मात्र, मी खोलात जाणार नाही असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसते, आडवा पडला असता असा एकही उल्लेख करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यांना जे ४१ मते पडले ना ते असं केल्यामुळे पडले, हे सांगताना गालावर हात ठेवून मंत्री गुलाबराव पाटील यांनी नक्कल करत संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---