राजमाता जिजाऊ महिला मंडळांचा एसटी संपास जाहीर पाठींबा

नोव्हेंबर 24, 2021 6:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । राज्य शासनात विलनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे सुमारे गेल्या 15 दिवसांपासून राज्य भरात संप सुरू असून शासनाने एसटी कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करीत राजमाता जिजाऊ महिला मंडळाने एरंडोलला एसटी आंदोलनास जाहीर पाठींबा दिला. यावेळी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचारींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

erondal jpg webp

सविस्तर असे की, एरंडोलला बस स्थानकाजवळ आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एसटी कर्मचारी वर्ग कुटूंबासह आंदोलनात सहभागी झाले असल्याने सहानुभूतीपूर्वक पाठींबा देत असून संप त्वरीत मिटावा अशा मागणीचे निवेदन यावेळी महिलांनी दिले. वास्तविक संप करून सामान्यांना अडचणीत आणणे शासनाने भाग पाडले आहे. अनेकवेळा आंदोलने केलीत परंतू शासनाने, महामंडळाने एसटी कर्मचार्‍यांची केवळ दिशाभूल करून फसणूकच केली असल्याने नाईलाजास्तव एसटी कर्मचारींना संपाचे हत्यार उपसावे लागले. असून शासनाने आतातरी जागे व्हावे, आणि कर्मचारी वर्गाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा यावेळी महिला मंडळ सदस्यांनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती 

सदरप्रसंगी राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, शकुंतला पाटील, मीना वसईकर, शोभा पाटील, अनिता चव्हाण, अन्नपूर्णा पाटील, लता प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचारींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now