⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | वाणिज्य | तूर्त दिलासा : वाचा आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

तूर्त दिलासा : वाचा आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. आज जळगावात पेट्रोल ११७ रुपयांवर १११ रुपयांवर आलं आहे. डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेपासून इंधनाचे दर जवळपास स्थिर आहेत.

देशातील इतर मोठ्या शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.