महिला गटातून : विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर विजयी

नोव्हेंबर 22, 2021 12:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महिला गटातून आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे  विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी अपेक्षेनुसार विजय मिळविला असून, दुसर्‍यांदा जिल्हा बँकेत एंट्री केली आहे.

khadse 1 jpg webp

सविस्तर असे की, जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ११ जागा आधीच बिनविरोध झाल्या. यात महिला गटातून आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर आणि छायादेवी दिलीपराव निकम यांना उमेदवारी मिळाली. या दोन्ही जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले तरी याला यश आले नाही. यामुळे अखेर या प्रवर्गासाठी निवडणूक घेण्यात आली. अर्थात, सहकार पॅनलची ताकद पाहता येथून रोहिणी खडसे यांचा विजय हा अगदी सहजसोपा असल्याचे मानले जात होते. आज निकालातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आज झालेल्या मतमोजणीत रोहिणी खडसे-खेवलकर यांना तब्बल २२००चा लीड मिळाला असून त्यांचा विजय निश्‍चीत आहे. त्या लागोपाठ दुसर्‍यांदा जिल्हा बँकेत संचालक म्हणून दाखल झाल्या आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now