दुचाकी वाहनांसाठी 23 नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका

नोव्हेंबर 17, 2021 5:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एम.एच-19, डी.डब्ल्यु- 0001 ते 9999 पर्यंतची मालिका 23 नोव्हेंबर, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज करावा. अर्जासोबत शासकीय शुल्काचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनाकर्ष, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

dichaki jpg webp

तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ही मालिका चालू असतांना वाहन-4 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत 22 नोव्हेंबर रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राहील. दिनांक 22 नोव्हेंबर, 2021 रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील.

जास्त रक्कमेचे धनाकर्ष सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनाकर्ष परत करण्यात येतील. तरी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या दुचाकी वाहन धारकांनी याची नोद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now