जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । कवयित्री, लेखिका पुष्पा साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

म्हसवड ( जि. सातारा ) येथे १९ नोव्हेंबर ला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. असे मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.








