BIG Breaking : मुंबईच्या NCB पथकाने जळगावात १५०० किलो गांजा पकडला

नोव्हेंबर 15, 2021 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जप्रकरण चांगलेच गाजत आहे.यात आता मुंबई एनसीबी पथकाने जळगावातील एरंडोल येथून १,५०० किलो गांजा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही कारवाई करण्यात आली.

cannabis

एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल१,५०० किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now