एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अभाविपचा पाठिंबा

नोव्हेंबर 12, 2021 6:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यात राज्यसरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय देत, यावर योग्य त्या मागण्या ग्राह्य धरून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, असे मागणी पत्रक देत एसटी कर्मचाऱ्यांना अभाविपतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे.

abhavip 1 jpg webp

सविस्तर असे की, महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामन्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जणारी ‘लालपरी’ आज बंद आहे. मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्यसरकार कर्मचारी म्हणून, सामावून घेण्याच्या व अश्या विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत. या संदर्भात अनेकवेळी राज्यात आंदोलन देखील झाले आहेत. आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील राज्यशासनाकडून दिले गेले. परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात तीव्र आंदोलन झालेली आहेत. या आंदोलना दरम्यान ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे. कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी पुकारलेल्या कामबंद आंदोलन प्रसंगी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.

परंतु योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे आता पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे व त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूकी संदर्भात गैरसोय होत आहे. काल दिनांक ११ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू झाले आहेत. विद्यार्थी बस पास काढून प्रवास करतात अनेक वाडी, वस्ती, पाडे व गावांत प्रवासासाठी दुसरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे.योग्य त्या मागण्या ग्राह्य धरून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असे मागणी पत्रक आज बस कर्मचारी यांना अभाविपने पाठिंबा दिला.

यावेळी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यात राज्यसरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय देत तोडगा काढावा असे मत नगर मंत्री मयूर माळी,नितेश चौधरी यांनी व्येक्त केले.व अभाविप एसटी कर्मचाऱ्यांन सोबत आहे.असे महानगर सहमंत्री पौर्णिमा देशमुख यांनी सांगितले. या वेळी मयूर माळी, अक्षय वाणी, पौर्णिमा देशमुख, मनीष चव्हाण,दुर्गेश वर्मा ऋत्विक महुरकर,नितेश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now