जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवार दि.१२ रोजी बोदवड तहसील कार्यालय येथे प्रभाग रचनेनुसार नवीन आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
बोदवड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. शुक्रवार दि.१२ रोजी बोदवड तहसील कार्यालयात तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसिलदार प्रथमेश घोलप व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. येत्या महिन्यात नगरपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने ही आरक्षण सोडत करण्यात आली.
असे आहे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक १ ओबीसी सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ जनरल, प्रभाग क्रमांक ३ ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक ४ जनरल महिला, प्रभाग क्रमांक ५ जनरल महिला, प्रभाग क्रमांक ६ जनरल महिला, प्रभाग क्रमांक ७ एस.टी. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ एस.सी. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ जनरल, प्रभाग क्रमांक १० ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक ११ जनरल महिला, प्रभाग क्रमांक १२ ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक १३ जनरल, प्रभाग क्रमांक १४ जनरल महिला, प्रभाग क्रमांक १५ जनरल, प्रभाग क्रमांक १६ जनरल महिला, प्रभाग क्रमांक १७ ओबीसी सर्वसाधारण, अशाप्रकारे आरक्षण असणार आहे.