दिवाळी निमित्त पत्नी गेली माहेरी, घरी एकट्या पतीने उचललं हे पाऊल

नोव्हेंबर 11, 2021 12:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय म्हणून नोकरीला असलेल्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील नवल कॉलनी रात्री उघडकीस आली आहे. जतीन जयप्रकाश चांगरे (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, जतीन यांच्या आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jatin changare jpg webp

याबाबत असे की, जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्याला असून ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय म्हणून नोकरीला आहे. दिवाळी निमित्त त्याची पत्नी व दोन्ही मुले माहरी मनमाड जि.नाशिक येथे गेल्या होत्या.

दरम्यान पत्नी व मुले गावाला गेल्यामुळे जतीन हा एकटाच होता. सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा रूग्णालयात कामावर होते. त्यानंतर ते घरी गेले. बुधवारी रात्री १० वाजता त्यांची पत्नी सुमित्रा ह्या मनमाड येथून घरी आल्या. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी भावाच्या मदतीने घर उघडण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या मजल्यावर जतीन यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले.

आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोउला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जतीनने दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now