लाचलुचपत जनजागृतीसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य गरजेचे : डीवायएसपी पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । समाजात लाचलुचपत जनजागृतीसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य गरजेचे आहे. यातून समाजात विकोप आणि सुदृढ वातावरण तयार होईल, आणि ही माझी जबाबदारी आजच्या युवकांवर आहे, असे प्रतिपादन जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी केले.
मु.जे.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉल येथे ‘भ्रष्टाचार जनजागृती अभियान-२०२१’चे आयोजन रविवार दि.३० रोजी करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनोज महाजन यांनी तर सुत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर यांनी केले. आभार डॉ.योगेश बोरसे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.