⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

शिल्पकलेतून “शिवरायांना” अनोखे अभिवादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त के.सी.ई सोसायटी संचालित मु.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ पर्फोर्मिंग आर्ट विभागातर्फे शिल्पकलेतून महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना. भारंबे, विभागप्रमुख प्रा.मिलन भामरे, प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा.भूपेंद्र केसुर, सुभाष तळेले, प्रा.ए.पी.सरोदे, प्रा.केतन नारखेडे, प्रा. पियुष बडगुजर, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा.दिलवरसिंग वसावे, प्रा.नम्रता महाजन आदी उपस्थित होते.

शिल्पकलेचा विद्यार्थी सागर चौधरी याने शाडू मातीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहुब व अतिशय बोलकी मूर्ती तयार केली या मूर्तीची ऊंची 2 फूट असून ती तयार करण्यासाठी साधारण अडीच ते 3 तास इतका वेळ लागला. मूर्ती तयार करण्यासाठी प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी प्रा. देवेंद्र गुरव, अजय शिंदे, दिनेश माळी, देवा सपकाळे, कुणाल जाधव, भूषण पाटील, रिटा घुगे, ईशा भावसार, लक्षिता जैन यांनी परिश्रम घेतले.