⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जळगाव जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या प्रशासनाद्वारा सूचना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । भारतीय हवामानखात्याद्वारे (IMD) आज जळगाव जिल्ह्यात वीजवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सर्व यंत्रणांच्या नियंत्रण कक्षांना सतर्क राहणेचे आदेश देण्यात आले आहेत.

जळगाव जिल्हयातील सर्व नागरीकांनी या बाबत दक्षता घ्यावी.नदी काठच्या गावांतील नागरीकांनी नदी पात्रात जाणे टाळावे.आवश्यकता असेल तेव्हाच घरा बाहेर पडावे, विजेचा कडकडाट होत असतांना झाडांचा आसरा न घेता सुरक्षीत ठिकाणी आसरा घ्यावा. आपात्कालीन काळात तालुकास्तरावर तहसील कार्यालय नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाच्या नियंत्रण कक्ष 0257-2217193- 2223180 व टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा, असे आव्हान जळगाव उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

dio order