यावल तालुक्यात  विविध कारणांनी अपघातात मृत्यु पावलेल्या कुटुंबांना शासकीय आर्थिक मदत 

ऑक्टोबर 25, 2021 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । विविध कारणांनी अपघातात मृत्यु पावलेल्या कटुंबातील कुटुंब प्रमुखांना राज्य शासनाच्या वतीने मिळणाऱ्या योजनेच्या माध्यमातुन शासकीय आर्थिक मदत यावल येथे आयोजित कार्यक्रमात यावल, रावेर क्षेत्राचे आ. शिरीष चौधरी व चोपडा आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले आहे.

yawal 13 jpg webp

सविस्तर असे की, रावेर आणी चोपडा मतदारसंघातील सहा लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे एक लाख रुपये , नैसर्गीक आपत्तीत मदतीअंतर्गत न्हावी येथील विज अंगावर कोसळुन मरण पावलेले हमीद तडवी यांच्या कुटुंबास  चार लाख तर मालोद येथे अंगावर  भिंत कोसळुन मरण पावलेल्या मुलीच्या कुटुंब प्रमुख दगडू भावडु तडवी यांना चार लाख आणी हिंगोणा येथील आत्महत्या केलेले शेतकरी किसन राणे यांच्या कुटुंबास १लाख रुपयांचे धनादेश अशा प्रकारे १० लाख रुपयांची मिळालेल्या शासनाच्या आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आली.

 

 

यांची उपस्थिती होती 

यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आ.शिरिष चौधरी, आ.लताताई सोनवणे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, पंचायत समिती भाजपाचे गटनेते दिपक पाटील, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर, ग्रामविस्तार अधिकारी हबीब तडवी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, पप्पु जोशी, संतोष खर्चे यांच्यासह आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now