नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कार्यक्रम निश्चित

ऑक्टोबर 21, 2021 7:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा पुरवठा कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने मंजुरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. हा जा

Untitled design 5 2 jpg webp

हिरनामा संबंधित तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही प्रसिध्द करण्यात आला असून नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट व सहकारी संस्था यांनाही अर्ज सादर करता येणार आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय २ जुलै २०१७ व दि. १६ सप्टेंबर २०२१ अन्वये जळगाव जिल्ह्यात आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, मयताचे वारस नसल्याने, वारसांने विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्याने, नवीन तसेच विविध कारणांमुळे अकार्यान्वित रास्तभाव दुकानाचा जाहिरनामा प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार १ ऑगस्ट, २०१७ व १६ सप्टेंबर २०२१ अन्वये जळगाव जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात अकार्यान्वित रास्तभाव दुकाने तसेच इतर कारणास्तव नवीन शिधावाटप दुकाने मंजूर करणेसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

नवीन रास्तभाव, शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजुर करण्याकरीता जाहिरनामा काढणे व प्रसिध्द करणे (स्थगनादेश नसल्यास) दि.१० ऑक्टोबर २०२१, संस्थांना अर्ज करण्याकरीता मुदत (३० दिवस) दि.१० नोव्हेंबर २०२१ पर्यंत, नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे (३० दिवस) दि.१० डिसेंबर २०२१ पर्यंत, नवीन दुकाने मंजुर करणे (१५ दिवस) दि.25 डिसेंबर २०२१ पर्यंत याप्रमाणे राहणार आहे.

जिल्हा पुरवठा कार्यालयाच्यावतीने जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील नवीन रास्तभाव दुकाने मंजुरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द केलेला असून जाहिरनामा संबंधित तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही प्रसिध्द केला आहे. शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वंयसहाय्य्ता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या रास्तभाव, शिधावाटप दुकानासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार रास्तभाव दुकानांसाठी अर्ज सादर करणेची प्रक्रिया ऑनलाईन करणेत येत आहे. इच्छुक संस्था, गटांनी आपल्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन प्रक्रियेविषयी अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी. असे जिल्हा पुरव्ठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now