⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | जिल्हाधिकारी गौरव साळुंखेंच्या आई-वडिलांच्या नावे अभ्यासिका उभारणार

जिल्हाधिकारी गौरव साळुंखेंच्या आई-वडिलांच्या नावे अभ्यासिका उभारणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । खेडगाव गावाच्या मातीने केवळ चाळीसगावच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात नावलौकिक मिळविणारी व्यक्तीमत्वे दिली, आज याच मातीच्या गौरव साळुंखे या सुपुत्राने भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) जिल्हाधिकारी मध्ये ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम व देशात १८२ रँक मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. सोबतच याच गावाचे सुपुत्र मयूरदादा सूर्यवंशी हे IAS, परिमल साळुंखे हे RFO, सचिन साळुंखे हे API पदी नियुक्त झाले.

चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या जिल्हाधिकारी पदाचा मान त्यांनी मिळवला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आज खेडगाव येथे आयोजित हा नागरी सत्कार एकट्या गौरव साळुंखे यांचा नसून त्यांना घडविणाऱ्या आई-वडील-बंधू आदी पूर्ण परिवाराचा हा सत्कार असल्याची भावना चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खेडगाव येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त केली तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व खेडगाव येथील नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी IAS गौरव साळुंखे यांच्या आई – वडिलांच्या नावाने माझ्या आमदार निधीतून एक सुसज्ज अभ्यासिका उभारेल अशी घोषणा देखील त्यांनी केली.

खेडगाव येथे आयोजित IAS गौरव साळुंखे यांच्यासह IAS मयूरदादा सूर्यवंशी, RFO परिमल साळुंखे, API सचिन साळुंखे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेषदादा पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदार भाऊ राजपुत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, मार्केट माजी संचालक विश्वजीत पाटील, यांच्यासह माजी जि.प.सदस्य साहेबराव तात्या साळुंखे, रावसाहेब साळुंखे, पंकज साळुंखे, प्रफुल्ल साळुंखे यांच्यासह खेडगाव पंचक्रोशीतील सरपंच, विकासो सदस्य, मान्यवर आदी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार चव्हाण म्हणाले की, राजकारणी म्हणून आम्हाला दर पाच वर्षांनी जनतेपुढे परीक्षेला सामोरे जावे लागते मात्र प्रशासकीय सेवेतील अधिकारी हे एकदा परीक्षा देऊन आपले पूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी देतात. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जिल्हाधिकारी पद गौरव साळुंखे यांना मिळाल्याने त्यांच्यापुढे अनेक संधी आहेत. जिल्हाधिकारीची जबाबदारी मोठी असते. एक शिक्षकाचा मुलगा जिल्हाधिकारी होतो ही मोठी गोष्ट आहे, ते आपल्या कार्यकाळात राज्याच्या मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचतील व त्यामाध्यमातून चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी योगदान देतील हा मला विश्वास आहे. क्षेत्र कोणतेही असो मेहनतीला दुसरा पर्याय नाही.

यांचा झाला सत्कार
सदर नागरी सत्कार सोहळ्यात सत्कारार्थी IAS गौरव रविंद्र साळुंखे व त्यांचे आई – वडील रविंद्र साळुंखे व सौ.सुरेखा साळुंखे, श्री.विकास सुर्यवंशी व सौ.छाया विकास साळुंखे, API सचिन साळुंखे, सुरेंद्र साळुंखे, निंबाजी साळुंखे, दत्तात्रय साळुंखे खेडगावचे सुपुत्र, ज्यांनी केवळ खेडगावच नव्हे तर चाळीसगाव तालुका, जळगाव जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

जळगाव जिल्ह्यातील नामांकित नूतन मराठा संस्थेचे संस्थापक स्व.केशवराव भाऊसाहेब साळुंखे व माजी आमदार, सहकार व शिक्षण महर्षी स्व.भाऊसाहेब टि टी साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.जयंतराव साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.बाळासाहेब शहाजीराव साळुंखे ज्यांनी गिरणा डाव्या कालव्यासाठी लढा दिला असे माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.भा.रा.आबा पाटील, भाजपा जेष्ठ नेते, माजी नगरसेवक स्व.जे जे अण्णा चौधरी, माजी सरपंच, गावाच्या जडणघडण मध्ये योगदान स्व.किसन रावसाहेब.

IAS गौरव साळुंखे यांचा जीवनप्रवास 

खेडगाव येथील रविंद्र शंकरराव साळुंखे व सौ सुरेखा रवींद्र साळुंखे ह.मु. चोपडा यांचा मुलगा गौरव रवींद्र साळुंखे
आई – वडील दोन्ही शिक्षक
भाऊ – प्रसाद रवींद्र साळुंखे – B. E. Mechanical Pune
ई.१० वी ला 96.91 टक्के मार्क मिळवून बोर्डात प्रथम
नंतर चोपडा येथे बारावी व पुणे सिंहगड कॉलेज येथे इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास डीस्टीक्शन
आत्मविश्वास व प्रेरणा अभियानांतर्गत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भेटण्याची संधी
बोर्डाकडून मेरिट व हिंदुजा फाउंडेशन कडून स्कॉलरशिप

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.