जळगावात उद्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांकरिता मोफत लसीकरण शिबीर

ऑक्टोबर 16, 2021 1:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । शहरातील बांधकाम क्षेत्रातील कामगार व परिवारातील सदस्यांकरता  नानीबाई रुग्णालय व चेतनदास रुग्णालयात मोफत शिबिर रविवारी १७ ऑक्टोबर रोजी मिशन कोरोनामुक्त जळगाव अंतर्गत आयोजित करण्यात  आले आहे.

Covid Vaccine jpg webp

महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांसाठी राज्यव्यापी लसीकरणाच्या मोहिमेअंतर्गत क्रेडाई जळगाव व जळगाव सिव्हिल इंजिनीअर्स असोसिएशन  यांच्यामार्फत रविवारी १७ ऑक्टोबर रोजी होत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने  शहरातील बांधकाम कामगार बांधव, तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांकरीता १७ ऑक्टोबर रविवारी एक दिवसीय मोफत लसीकर मोहीम आयोजित झाली आहे.  कार्यक्रमाचे अदघाट्न महापौर जयश्री महाजन ह्या करणार आहेत .

लसीकरण अंतर्गत नानीबाई अग्रवाल रुग्णालयात कोविशिल्ड तर  चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्यक्सीन दिली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी पहिला व दुसरा डॉस दिला जाणार आहे. येताना सोबत आधारकार्ड व ओटीपी साठी मोबाईल आणावे. कामगार बांधवानी त्यांच्या परिवाराचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन क्रेडाई महाराष्ट्राचे सहसचिव अनिष शाह, जळगावचे हामीत अली, सचिव दीपक सराफ, जळगाव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद राठी, सचिव मिलिंद काळे व प्रकल्प प्रमुख तुषार तोतला ह्यांनी केले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now