नाट्य थिएटर पुन्हा गजबजणार, वाचा काय आहेत नियम…

ऑक्टोबर 14, 2021 12:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । देशासह महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. दरम्यान, कोरोना कमी झाल्याने अनेक निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यात आता महाराष्ट्रातील चित्रपटगृह, नाट्यगृह उघडण्यास तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार चित्रपटगृहे आणि नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून उघडणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नियमावली जाहीर केली आहे.

cinema theter

कोविड-१९ विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी घातलेल्या निर्बंधांमुळे सदर घटक मोठया प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. दरम्यान, राज्यातील चित्रपटगृहे आणि नाटयगृहांप्रमाणेच चित्रपट व नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथील करणे बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२५ सप्टेंबरच्या बैठकीत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता.  अखेर यासंदर्भातील घोषणा राज्य सरकारने केली असून यासाठी २२ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

काय आहे नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी नियमावली

– प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी नाही.
– जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
– कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
– मास्क, सॅनिटायजरचा वापर आवश्यक.
– प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.
– केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करावे.
– आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक.
– कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
– ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.
– आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now