नशिराबादला अजिंक्य महिला मंडळाची स्थापना

ऑक्टोबर 5, 2021 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । नशिराबाद येथील साथी बाजार परिसरात असलेल्या अजिंक्य महिला मंडळाला यंदा प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळात महिलांनी पुढाकार घेतला असून दहा दिवस मंडळाचा सर्व कारभार महिलाच सांभाळणार आहेत. नवरात्रोस्तवादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम कार्यक्रम देखील महिलावर्ग राबविणार आहे.

Untitled design 2021 10 05T151709.454 jpg webp

नवरात्र उत्सवाला दि.७ ऑक्टोंबर रोजी सुरुवात होत आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त नशिराबाद गावात प्रथमच अजिंक्य महिला मंडळ स्थापन करून दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. मंडळाचा कारभार महिला सांभाळणार असून उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. महिलाच मातेची गरबा, दांडिया खेळत स्थापना व विसर्जन ही करणार आहे.

महिलांनीही उत्सवात सहभागी व्हावे
यावर्षी अजिंक्य महिला दुर्गा उत्सव मंडळातर्फे सर्व कारभार महिलांच्या हस्ते होणार असून महिलांनी प्रत्येक उत्सवात सहभाग नोंदवून उपक्रम राबवावे, ही संकल्पना आम्ही सर्व सदस्यांनी मांडत पुढाकार घेतला आहे. दहा दिवसात विविध उपक्रम मंडळातर्फे राबवले जाणार असून गरबा, दांडिया खेळत मातेची स्थापना व विसर्जन महिलांच्या हस्ते होणार आहे, असे मंडळाच्या अध्यक्षा शारदा भावसार यांनी सांगितले.

अशी आहे महिला उत्सव समिती
अजिंक्य महिला दुर्गाउत्सव मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली.  बैठकीत अध्यक्ष शारदा भावसार, उपाध्यक्ष संगीता चौधरी, खजिनदार सुनीता शिवराम, सचिव माधुरी कोलते, सदस्य पुष्पा नांदुरकर, रेखा शिवराम, सोनल टापरे, सुनिता माळी, लक्ष्मी यवकार, शोभा बाविस्कर, कविता राजपूत, अलका सपकाळे, अनिता महाजन, सीमा भावसार, साधना पाटील आदींची निवड करण्यात आली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now