आझाद नगरात तणाव ; पोलिसांवर दगडफेक, एक जखमी

ऑक्टोबर 2, 2021 11:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । शहरातील खंडेराव नगर भागात असलेल्या आझाद नगर भागात शनिवारी रात्री दोन गटात वाद झाला. घटनास्थळी मोठा जमाव जमला असून दोन्ही बाजूने दगडफेक झाली आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून तणाव कायम आहे.

IMG 20211002 WA0010 jpg webp

शहरातील खंडेराव नगर परिसरात असलेल्या आजाद नगर भागात आज सायंकाळी शनिवारचा बाजार होता. बाजारात एका मुलीची छेड काढल्यावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास वाद झाला. एक गट दुसऱ्या गटाला जाब विचारायला गेला असता दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली.

वाद वाढल्याने काही वेळाने दोन्ही कडील गट आमनेसामने येऊन दगडफेक सुरू झाली. वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली. घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक पोहचले असून संशयितांची धरपकड सुरू आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now