जळगाव लाईव्ह न्युज । गौरी बारी । दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाकडे वळले आहे. कोरोनाचे नियम पाळत चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरातील D.N.C.V.P.S. शिरीष मधुकरराव चौधरी या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
D.N.C.V.P.S. शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय येथे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रवेश पूर्ण केला जात आहे व विद्यार्थी देखील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेऊन महाविद्यालयाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तयार आहेत. कोरोनाच्या सावटा खाली दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आलेत. परंतु आता कोरोना निर्बंध कमी झाल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घेत आहे.
D.N.C.V.P.S. शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयातील Arts and Science Jr. College मध्ये अकरावी विज्ञान शाखेत २४० जागा असून २२६ विद्यार्थांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर बारावी विज्ञान शाखेत २४० पैकी १९३ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून आपले प्रवेश निश्चित केले आहे.
तर महाविद्यालयात वाणिज्य (FY. B.com) शाखेत ३६० जागा असून आता पर्यंत २१० विद्यार्थांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर विज्ञान (FY. Bsc ) शाखेत ६०० जागा असून २०० विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. हव्या त्या शाखेची संपूर्ण माहिती मिळवून विद्यार्थी आपला प्रवेश घेताना दिसत आहे.
महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया
D.N.C.V.P.S. शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर वर जाऊन ऑनलाईन प्रवेश निश्चित करून नंतर महाविद्यालयात आवश्यक ते कागदपत्र जोडून व प्रवेश फी चे चलन भरून महाविद्यालयात जमा करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर पर्यंत आहे या बद्दल ची संपूर्ण माहिती प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे व प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. एम एस काळे यांनी दिली.